नवी दिल्ली - पाकिस्तान भारताच्या नवीन सरकारसोबत प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री महमूद कुरेशी यांनी सांगितले. दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ करण्यासठी पाकिस्तान भारताच्या नवीन सरकारबाबत आशादायी आहे. त्यासाठी दोन्हा देशांनी चर्चा करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
पाकिस्तान भारताच्या नव्या सरकारसोबत चर्चा करण्यास तयार - पुलवामा
पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील राजकीय तणाव वाढला होता. मात्र, लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या एक दिवस आधी भारतीय पराराष्ट्रमंत्री सुष्मा स्वराज आणि कुरेशी यांनी किर्गिस्तानच्या बिश्केक शहरात झालेल्या शांघाय सहकार संघटनेच्या बैठकीत एकमेकांची चौकशी केली होती.
पाकिस्तानच्या शासकीय रेडीओने दिलेल्या बातमीनुसार कुरेशी यांनी मुल्तान शहरातील एका इफ्तार पार्टीला संबोधीत केले. त्यावेळी ते म्हणाले, की भारत आणि पाकिस्तान यांच्यात समृध्दी आणि शांततेसाठी चर्चा व्हायला हवी. दरम्यान, यापूर्वीच पाकिस्तान सरकारने पंतप्रधान मोदींना विजयाबद्दल शभेच्छा दिल्या आहेत. दक्षिण आशियात शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी एकत्र येऊन काम करण्याची इच्छा इम्रान खान यांनी व्यक्त केली होती.
पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील राजकीय तणाव वाढला होता. मात्र, लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या एक दिवस आधी भारतीय पराराष्ट्रमंत्री सुष्मा स्वराज आणि कुरेशी यांनी किर्गिस्तानच्या बिश्केक शहरात झालेल्या शांघाय सहकार संघटनेच्या बैठकीत एकमेकांची चौकशी केली होती. कुरेशी यांनी स्वराज यांच्याजवळ दोन देशांतील संबंध सुधारण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती.