नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरची स्वायतत्ता काढून घेतल्यानंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाया वाढवल्या आहेत. पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी गट भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच पाकिस्तानी लष्कराने सीमेवर २ हजारांपेक्षा जास्त सैनिकांना तैनात केले आहे. ही संख्या लष्कराच्या एका ब्रिगेड एवढी असल्याची माहिती मिळत आहे.
भारत पाकिस्तान दरम्यान नियंत्रण रेषेच्या पलिकडे ३० किमी अंतरापर्यंत हे सैनिक आले आहे. नियंत्रण रेषेजवळील वाघा आणि कोटली क्षेत्रामध्ये पाकिस्तानी सैन्याने तळ ठोकला आहे. मात्र, भारतीय लष्कर पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने लक्ष ठेऊन आहे. पाकिस्तानी लष्कराने आधीपासूनच दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यास सुरवात केली आहे. लष्कर- ए -तोयबा आणि जैश -ए -मोहम्मदच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर भारतामध्ये घुसखोरी करण्यास मदत करत आहे.
हेही वाचा - पाकिस्तानला 1971 पेक्षाही अधिक जबरदस्त धडा शिकवू - लेफ्टनंट जनरल धिल्लाँ