महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

एनपीआर-एनआरसी एकाच नाण्याच्या दोन बाजू - पी.चिदंबरम - NPR and NRC

माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीवरून (एनपीआर) वरून केंद्र सरकारवर टीका केली.

पी.चिदंबरम
पी.चिदंबरम

By

Published : Jan 4, 2020, 10:17 PM IST

नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीवरून (एनपीआर) वरून केंद्र सरकारवर टीका केली. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

आम्ही फक्त एनपीआर करत असून एनआरसी करणार नाही, असे गृहमंत्री स्पष्टपणे सांगत नाहीत. आम्ही एनआरसी रद्द केल्याचे त्यांनी सांगावे. 2010 मध्ये आम्ही फक्त एनपीआर केले होते. त्यामुळे 2011 ची जनगणना करण्यास मदत झाली होती. आम्ही केलेल्या एनपीआर आणि आता भाजप करत असलेल्या एनपीआरमध्ये खूप फरक आहे. त्यावेळी आम्ही फक्त नागरिकांचे 15 तपशील घेतले होते. मात्र भाजप सुरू करत असलेल्या एनपीआरमध्ये नागरिकांचे 21 तपशील मागितले जात आहेत, असे चिदंबरम म्हणाले.

आसाममध्ये एनआरसी केल्यामुळे तब्बल 19 लाखांपेक्षा अधिक लोकांना राज्यातील मानले जात नाही. तुम्हाला वाटते की, कोणतीच समस्या नाही, असेही चिदंबरम म्हणाले.

आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणीची अंतिम यादी जाहीर झाली. भारतीय नागरिकत्त्वाच्या यादीमध्ये ३ कोटी ११ लाख २१ हजार ४ लोकांचा समावेश करण्यात आला. तर १९ लाख ६ हजार ६५७ लोकांना यातून वगळण्यात आले आहे. ज्या लोकांचा या यादीमध्ये समावेश झाला नाही, त्यांना नागरिकत्त्व सिद्ध करण्याची संधी देण्यात येणार आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details