नवी दिल्ली- केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या निवासस्थानासमोर नोटीस लावली असून त्यांना पुढील दोन तासात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मंगळवारी सकाळी दिल्ली उच्च न्यायालयाने आयएनएक्स मीडिया प्रकरणातील चिंदबरम यांचे दोन अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले होते. मंगळवारी सायंकाळी सीबीआयची टीम चिंदबरम यांच्या घरी दाखल झाली होती. मात्र, चिंदबरम त्यावेळी घरी उपस्थित नव्हते. दरम्यान, सीबीआयने चिदंबरम यांना दोन तासात हजर राहण्याची नोटीस बजावल्याने त्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.