महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'मला घरचे जेवण मिळावे,' चिदंबरम यांचा तिहार तुरुंगात अर्ज

पी. चिदंबरम यांनी आपल्याला घरचे जेवण मिळावे, असा अर्ज तिहार तुरुंगात केला आहे. त्यांच्यावर आयएनएक्स मीडिया प्रकरणात 305 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

चिदंबरम

By

Published : Oct 1, 2019, 6:36 PM IST

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे जामीन अर्ज न्यायालयाने अनेकदा फेटाळले आहेत. आता त्यांनी आपल्याला घरचे जेवण मिळावे, असा अर्ज तिहार तुरुंगात केला आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चिदंबरम यांना २१ ऑगस्टला अटक केली होती. त्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआय त्यांची भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करत असतानाच अंमलबजावणी संचलनालय (ईडी) त्यांची अवैध संपत्ती प्रकरणी चौकशी करत आहे.

चिदंबरम यांच्यावर परकीय गुंतवणूक संवर्धन बोर्डाकडून (एफआईपीबी) आयएनएक्स मीडियाला मंजुरी देताना 2007 मध्ये 305 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्यावेळी ते अर्थमंत्री होते.

ABOUT THE AUTHOR

...view details