महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गांधीजींचा खून करणाऱ्याला महात्मा म्हणायचे का ? ओवैसींकडून कमल हसनच्या वक्तव्याचे समर्थन - person

कमल हसन यांनी तामिळनाडूच्या अरावाकुरिची विधानसभा क्षेत्रात आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत नथूराम गोडसेबद्दल वक्तव्य केले होते.

असदुद्दीन ओवैसी

By

Published : May 14, 2019, 5:12 PM IST

Updated : May 14, 2019, 5:18 PM IST

हैदराबाद - कमल हसन यांनी महात्मा गांधीचा खून करणाऱ्या नथूराम गोडसे याला पहिला दहशतवादी असे म्हटले होते. यावर भाष्य करताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी गांधीजींचा खून करणाऱ्यांना महात्मा म्हणायचे का ? असा सवाल केला आहे.

कमल हसन यांनी तामिळनाडूच्या अरावाकुरिची विधानसभा क्षेत्रात आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत नथूराम गोडसेबद्दल वक्तव्य केले होते. या वक्तव्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे भाजपने म्हटले आहे.

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी कमल हसन यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, ज्याने महात्मा गांधीचा खून केला,त्याला महात्मा म्हणणार का ? त्याला दहशतवादीच म्हणावे लागेल. कपूर आयोगाच्या अहवालाने देखिल गोडसेवर असलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब केला आहे.

Last Updated : May 14, 2019, 5:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details