नवी दिल्ली -बीएसएफ आणि सीआरपीएफ यासारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये एक लाखापेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. दलातील अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती, मृत्यू, राजीनाम्यामुळे या जागा रिक्त आहेत.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये एक लाखापेक्षा अधिक जागा रिक्त - सीआरपीएफ
बीएसएफ आणि सीआरपीएफ यासारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये एक लाखापेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी निर्धारित कार्यपद्धती आहे. विद्यमान तरतुदींनुसार थेट भरती, पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीद्वारे ही पदे भरली जातात.
सीमा सुरक्षा दल म्हणेजच बीएसएफमध्ये सर्वांत जास्त 28,926 रिक्त जागा आहेत. त्यानंतर सीआरपीएफ मध्ये (केंद्रीय राखीव पोलीस दल) 26,506, सीआयएसएफ (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला) 23,906, एसएसबी (सशस्त्र सेना दल ) 18,643, आयटीबीपीमध्ये (इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस) 5,784 आणि आसाम रायफल्समध्ये 7,328 जागा रिक्त आहेत, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले.
या रिक्त जागा भरण्यासाठी प्रस्थापित कार्यपद्धती आहे. विद्यमान तरतुदींनुसार भरती, थेट भरती, पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीद्वारे केली जाते. सीएपीएफमधील रिक्तपदे भरण्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलली आहेत, ही एक नियमित प्रक्रिया आहे, असे त्यांनी सांगितले.