नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी गुरुवारी अल-कायदाच्या म्होरक्याच्या धमकीला सडेतोड उत्तर दिले आहे. 'अशा धमक्या आपण ऐकतच राहतो त्यामुळे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, भारतीय सैन्याकडे भरपूर प्रमाणात संसाधन उपलब्ध असून भारतीय सैनिक आपले कर्तव्य बजावण्यास सक्षम आहेत, या शब्दात त्यांनी अल-कायदा म्होरक्याच्या व्हिडिओला उत्तर दिले आहे.
अल कायद्याच्या म्होरक्याची धमकी गांभिर्याने घेण्याची गरज नाही - रविशकुमार - security
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी गुरुवारी अल-कायदाच्या म्होरक्याच्या धमकीला सडेतोड उत्तर दिले आहे.
रवीश कुमार यांनी अमेरिकेसोबत असलेल्या भारतीय संबधावर भाष्य केले. भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापारासंबधीत असलेल्या सर्व समस्यावर चर्चा करुन त्यावर उपाय काढण्यासाठी दोन्ही देशांचे अधिकारी भेटणार आहेत. मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या ओसाका येथील भेटी दरम्यानच हे ठरले होते, असे रविशकुमार यांनी सांगितले आहे. याचबरोबर त्यांनी कर्तारपूर कॉरीडॉर लवकरात लवकर सुरु व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे सांगितले आहे.
जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटनांपैकी एक अल-कायदाच्या म्होरक्याचा नवा व्हिडिओ मंगळवारी जारी करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये ऐमन अल-जवाहिरीने काश्मीरवरून भारताला धमकावले होते यामध्ये त्याने काश्मीरला विसरू नका या नावाने संदेश देत भारताला इशारा दिला होता.