महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून गदारोळ, राज्यसभा बुधवार सकाळपर्यंत तहकूब - venkaiaa naidu

उपराष्ट्रपतींनी कामकाज चालू देण्याची विनंती करीत विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक विरोधकांनी मागणी रेटून धरत सदनातून वॉकआऊट केले. यानंतर विरोधकांच्या गोंधळामुळे सदनाचे कामकाज चार वेळा तहकूब करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांचे राज्यसभेतून वॉकआऊट, कामकाज तहकूब
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांचे राज्यसभेतून वॉकआऊट, कामकाज तहकूब

By

Published : Feb 2, 2021, 9:55 AM IST

Updated : Feb 2, 2021, 12:44 PM IST

नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर मंगळवारी सकाळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जोरदार गदारोळ बघायला मिळाला. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करणाऱ्या विरोधकांच्या गदारोळामुळे सकाळी सदनाचे कामकाज चार वेळा तहकूब करावे लागले. सुरूवातीला सकाळी साडेदहा वाजेपर्यंत, नंतर साडेअकरापर्यंत, नंतर दुपारी साडेबारा वाजेपर्यंत तर त्यानंतर बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत सदनाचे कामकाज तहकूब करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक विरोधकांच्या गदारोळामुळे सदनाचे कामकाज पुढे जाऊ शकले नाही.

सुरूवातीला विरोधकांचे वॉकआऊट

तत्पूर्वी कामकाजाला सुरूवात झाल्यावर उपराष्ट्रपतींनी कामकाज चालू देण्याची विनंती करीत विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक विरोधकांनी मागणी रेटून धरत सदनातून वॉकआऊट केले. यानंतर सभापतींनी सुरूवातीला सकाळी 10.30 पर्यंत सदनाचे कामकाज तहकूब केले होते. यानंतर पुन्हा दोन वेळा तर नंतर बुधवार सकाळपर्यंत सदनाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

या खासदारांनी दिली नोटीस

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तातडीने चर्चेची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावरून राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली. काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा, भाकपचे खासदार बिनॉय विस्वम, तृणमूल खासदार सुखेंदू शेखर राय, डिएमके खासदार तिरुची शिवा, बसप खासदार अशोक सिद्धार्थ, माकप खासदार एलामरम करीम, राजद खासदार मनोज झा यांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी या खासदारांनी केली आहे.

उपराष्ट्रपतींची विनंती

यावर बोलताना सभापती व्यंकय्या नायडूंनी विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. हा महत्वाचा विषय आहे. मात्र यावर उद्या चर्चा होणार आहे. राष्ट्रपतींनी हा मुद्दा त्यांच्या भाषणात उपस्थित केला. आज चर्चा व्हावी असे मला वाटते. मात्र सर्वप्रथम चर्चा लोकसभेत होईल असे मला सांगण्यात आले. आम्हीही याला सहमती दर्शविली असे व्यंकय्या नायडूंनी सांगितले.

Last Updated : Feb 2, 2021, 12:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details