महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारताने केलेल्या हवाई हल्ल्याची सॅटेलाईट छायाचित्रे प्रसिद्ध - bomb

'जैश'च्या तळांवर हल्ला केल्यानंतरची ही छायाचित्रे असून याठिकाणी काहीच उद्ध्वस्त झालेले या छायाचित्रांमध्ये दिसत नाही.

सॅटेलाईट छायाचित्रे

By

Published : Mar 6, 2019, 11:41 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे सध्या मागितले जात आहेत. भारताने केलेल्या या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले आहेत याची विचारणा होत आहे. आता यासंबंधी काही सॅटेलाईट छायाचित्रे समोर आली आहेत. माध्यमांमधून आलेल्या अहवालात ही छायाचित्रे समोर आली आहेत.'जैश'च्या तळांवर हल्ला केल्यानंतरची ही छायाचित्रे असून याठिकाणी काहीच उद्ध्वस्त झालेले या छायाचित्रांमध्ये दिसत नाही.

भारतीय वायुसेनेनेही सरकारला काही छायाचित्रे सादर केली आहेत. ज्यात स्पाईस २००० ग्लाईड बॉम्ब ५ इमारतींवर टाकल्याचा परिणाम दिसून येत आहे.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला होता. यात सीआरपीफच्या ४० जवानांना वीरमरण आले होते. यानंतर भारताने पाकिस्तानच्या बालाकोट येथे हवाई हल्ला केला. यानंतर भारताकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांबाबत पुरावे मागायला सुरुवात झाली. अनेकांनी सरकारला याबाबत विचारणा केली.

ABOUT THE AUTHOR

...view details