भोजपूर -कोरोनामहामारीमुळे देशभरात लॉकडाउन सुरू आहे. लोक घरात बसून वेळ जात नसल्याने कंटाय़ळले आहेत. त्यांना या रिकाम्या वेळात काही संगीत शास्त्राची माहिती व्हावी, शिकायला मिळावे आणि मनोरंजनही व्हावे, या उद्देशाने संगीत शास्त्राच्या ऑनलाईन क्लासची संकल्पना पुढे आली आहे. शिवादी क्लासिक सेंटर ऑफ आर्ट अॅण्ड म्यूजिक संस्थेने भोजपूरमध्ये ही अनोखी संकल्पना राबवली आहे.
लॉकडाऊनदरम्यान बिहारच्या भोजपूरमध्ये दिले जाताहेत संगीताचे 'ऑनलाईन' धडे - patna news
रिकाम्या वेळात काही संगीत शास्त्राची माहिती व्हावी, शिकायला मिळावे आणि मनोरंजनही व्हावे, या उद्देशाने संगीत शास्त्राच्या ऑनलाईन क्लासची संकल्पना पुढे आली आहे. शिवादी क्लासिक सेंटर ऑफ आर्ट अॅण्ड म्यूजिक संस्थेने भोजपूरमध्ये ही अनोखी संकल्पना राबवली आहे.
कथक नृत्यांगना
या संस्थेद्वारे ऑनलाइन लाइव्ह कन्सर्ट अॅण्ड कॉन्व्हर्सेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगीत आणि नृत्याचे धडे देण्यात येत आहेत. कला आचार्य गुरु बक्शी विकास यांच्या नेतृत्वाखाली या वर्गांचे संचलन केले जात आहे. या वर्गांमध्ये देशभरातील संगीत शास्त्री आणि नृत्यांगना या कलांविषयी बारकाईने माहिती देतात.
'लाइव्ह संवादा'त दिली ही माहिती
- नवी दिल्लीतील प्रसिद्ध संगीत शास्त्री पंडित देवेंद्र वर्मा यांनी संगीत शास्त्राचे महत्त्व सांगितले. संगीतात 6 राग आणि 36 रागिणींची प्राचीन परंपरा असल्याचे ते म्हणाले. आज संगीतातील अभ्यास विद्यापीठीय स्तरापर्यंत पोहोचला आहे आणि हा विषय सखोल अभ्यासला जात असल्याचे ते म्हणाले.
- पुण्याचे प्रसिद्ध तबला वादक पंडित अरविंद कुमार आजाद यांनीही या चर्चासत्रात सहभाग घेतला. साथ-संगत करणे हा तबल्याच्या उत्पत्तीचा मूळ उद्देश असल्याचे ते म्हणाले. एखाद्याला संगीतात रस असल्याशिवाय यात प्रविण होणे अशक्य आहे, असे ते म्हणाले.
- कथक गुरु बक्शी विकास यांनी कहा कि कौशल्य नदीप्रमाणे असल्याचे सांगितले. याचे वाहणे कधीही थांबत नाही. आज आपल्याला विज्ञानाने अशी साधने दिली आहेत की, त्यांच्या मदतीने आपण घरबसल्याही संगीताचे सृजनात्मक कार्य करू शकतो. याचा संपूर्ण समाजला लाभ होऊ शकतो.
- कथक नृत्यांगना सोनम कुमारी, कथक नर्तक अमित कुमार, रविशंकर और राजा कुमार यांनीही या ऑनलाईन कार्यक्रमात सहभाग घेतला.