श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात चकमकी दरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. तसेच दहशतवाद्यांशी लढताना जम्मू काश्मीर पोलीस दलाचा एक जवानही हुतात्मा झाला आहे. वीरमरण आलेला जवान (एसपीओ) विशेष पोलीस अधिकारी म्हणून काश्मीर पोलीस दलामध्ये कार्यरत होता.
जम्मू काश्मीरमध्ये चकमकीदरम्यान जवानास वीरमरण, एका दहशतवाद्यास कंठस्नान - जवान हुतात्मा
जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात चकमकी दरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.
दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर २ ते ३ दहशतवाद्यांबरोबर लष्कर आणि काश्मीर पोलिसांची चकमक सुरू होती. मंगळवारी रात्री सुरू झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी सर्व परिसराला घेरा घातला आहे.
भारताने ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लघंन करण्यात येत आहे. तसेच पाकव्याप्त काश्मीरातून दहशतवाद्यांना भारतात पाठवण्यात येत आहे. राज्यामध्ये चकमक आणि शस्त्रसंधीच्या घटना वाढल्या आहेत. मागच्या आठवड्यात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यामध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या ३ जवानांचा खात्मा केला. यावेळी पाकिस्तानने भारताचे ५ जवान मारल्याचा दावा केला होता. मात्र, भारतीय लष्कराने हा दावा खोडून काढला.