कोलकाता - 'एक देश, एक निवडणूक' या संकल्पनेवर चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी इतक्या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेण्यासाठी फक्त एक दिवस चर्चा करणे पुरेसे ठरणार नाही असे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या बैठकीत सामील होण्यास ममता बॅनर्जींचा नकार - pm modi
'याप्रकरणी राज्यघटनेची संपूर्ण माहिती असणारे तसंच निवडणूक तज्ञ आणि सर्व पक्ष सदस्यांशी चर्चा करण्याची गरज आहे,' असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
‘एक देश, एक निवडणूक’ ही संकल्पना अनेक विरोधी पक्षांनी डावलली आहे. अनेक नेत्यांनी सरकारने चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीचं निमंत्रणही नाकारले आहे. 'याप्रकरणी व्हाइट पेपर आणणे गरजेचे आहे. तसेच या मुद्द्यावर तज्ज्ञांशी चर्चा करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याप्रकरणी राज्यघटनेची संपूर्ण माहिती असणारे तसंच निवडणूक तज्ञ आणि सर्व पक्ष सदस्यांशी चर्चा करण्याची गरज आहे,' असे ममता बॅनर्जी यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.