नवी दिल्ली -केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सर्व सीमांवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. यातच आज पुन्हा एका शेतकऱ्याचा ड्रेन नंबर 8 मध्ये पडल्याने मृत्यू झाला आहे. भीम सिंह असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ते पंजाबच्या संगरूरमधील रहिवासी आहेत. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवला आहे.
गेल्या सोमवारी आणि बुधवारी दोन शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. हे दोन्ही शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी पंजाबहून दिल्लीला आले होते. तर बुधवारीच शेतकरी आंदोलनातील संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. बाबा राम सिंह हे करनालमधील सिंगडा गावाचे रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोटदेखील समोर आली आहे. सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचेही त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. आतापर्यंत आंदोलनात 5 ते 6 शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे.
'दिल्ली चलो' आंदोलनाचा 22वा दिवस -