महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीर : चकमकीदरम्यान एक नागरिक ठार, एका दहशतवाद्याचाही खात्मा - Jammu and Kashmir terrorist killed news

पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी पामपोर शहरातील लालपोरा भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या शोध पथकावर गोळीबार केल्यानंतर 22 वर्षीय आबिद मीर जखमी झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण नंतर त्यांचा मृत्यू झाला.

जम्मू-काश्मीर चकमक न्यूज
जम्मू-काश्मीर चकमक न्यूज

By

Published : Nov 6, 2020, 6:58 PM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकाचा शुक्रवारी रुग्णालयात मृत्यू झाला. येथे सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाला आहे.

पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी पामपोर शहरातील लालपोरा भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या शोध पथकावर गोळीबार केल्यानंतर 22 वर्षीय आबिद मीर जखमी झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण नंतर त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा -मध्य प्रदेश : दोनशे फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या प्रह्लादला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू

लालपोरा भागात दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू आहे. पाम्पोर चकमकीत अज्ञात दहशतवादी ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मोहीम अजून चालू आहे.

सुरक्षा दलांनी घेरलेल्या घरात दोन ते तीन अतिरेकी लपून बसल्याची माहिती आहे. सैनिकांनी वारंवार आवाहन करून दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले.

गुरुवारी रात्री सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरू केल्यावर चकमकीस प्रारंभ झाला. अतिरिक्त पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले असून उर्वरित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा -तांत्रिकाच्या बोलण्याला फसून स्वतःच्या मुलीची हत्या केल्या प्रकरणी एकाला अटक केली

ABOUT THE AUTHOR

...view details