महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

श्रावणी सोमवारानिमित्त मध्यप्रदेशातील उज्जैन महाकाल मंदिरात भक्तांची मांदियाळी - श्रावणी सोमवार

श्रावणी सोमवारानिमित्त मध्यप्रदेशातील उज्जैन महाकाल मंदिरात भक्तांची रात्रीपासूनच रांग लागलेली आहे. याठिकाणी लाखो भाविक-भक्त दर्शनासाठी गर्दी करीत आहेत.

श्रावणी सोमवारानिमित्त मध्यप्रदेशातील उज्जैन महाकाल मंदिरात भक्तांची मांदियाळी

By

Published : Aug 12, 2019, 8:47 AM IST

भोपाळ - मध्यप्रदेशातील उज्जैन येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. आज हिंदी भाषिक लोकांचा चौथा श्रावणी सोमवार असल्याने उज्जैन महाकाल मंदिरात रविवारी मध्यरात्रीपासूनच भक्तांची दर्शनासाठी रांग लागली आहे.

श्रावणी सोमवारानिमित्त मध्यप्रदेशातील उज्जैन महाकाल मंदिरात भक्तांची मांदियाळी

भक्तांनी सोमवारी रात्री १ वाजतापासून भस्म आरतीसाठी रांग लावली होती. त्यानंतर रात्री अडीच वाजताच्या सुमारास ढोल-ताशाच्या गजरात भस्म आरतीला सुरुवात झाली. यावेळी दूध, दही, तूपाने भगवान महाकालचा अभिषेक करण्यात आला. यावेळी मंत्री जयवर्धन सिंह देखील उपस्थित होते. त्यानंतर भाविक-भक्तांसाठी दर्शनासाठी मंदिर सुरू करण्यात आले. श्रावण महिन्यात व्रत-वैकल्य केल्याने भगवान प्रसन्न होतात. तसेच भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात, अशी भाविक-भक्तांची श्रद्धा आहे. त्यामुळे लाखोच्या संख्यने भाविक-भक्त महाकाल मंदिरात येऊन पूजा-अर्चा करीत असतात.

ABOUT THE AUTHOR

...view details