महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'भाजप खासदार ओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष होणार' - महर्षी दयानंद सरस्वती

राजस्थानमधील कोटा येथून खासदार झालेले ओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष होणार आहेत.

ओम बिर्ला

By

Published : Jun 18, 2019, 11:20 AM IST

नवी दिल्ली - लोकसभेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत होणाऱ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. राजस्थानमधील कोटा येथून खासदार झालेले ओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष होणार आहेत. सर्वांच्या सहमतीनुसार ओम बिर्ला आज अर्ज दाखल करणार आहेत.

ओम बिर्ला यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, की मला याबाबत काहीही माहिती नव्हती. मी कार्यकारी अध्यक्षांना एका कार्यकर्त्याच्या नात्याने भेटायला गेलो होतो. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानावरून निघताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. बिर्ला यांनी आज अर्ज दाखल केल्यानंतर बुधवारी मतदानाची प्रकिया पार पडणार आहे. एनडीएकडे आवश्यक बहुमत असल्यामुळे त्यांची अध्यक्षपदासाठी नियुक्ती होणार हे निश्चित आहे.

महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. यानंतर, १९७९ साली ते विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बनले. सक्रीय राजकारणात उतरल्यानंतर ते भारतीय जनता युवा मोर्चासाठी काम करू लागले. बिर्ला पहिल्यांदा प्रदेश अध्यक्ष बनले. यानंतर, ते राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले. २००३ साली भाजपच्या तिकिटावर ते २००३ साली कोटा येथून आमदार झाले. यानंतर, ते सलग ३ वेळा कोटा येथून खासदार झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details