महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जाणून घ्या, लोकसभेचे नवे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याबद्दल - सल्लागार

अमित शाह यांच्या जवळचे म्हणून ओम बिर्ला यांना ओळखले जाते. त्यांनी राजस्थान सरकारमध्ये संसदीय सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.

ओम बिर्ला

By

Published : Jun 18, 2019, 2:05 PM IST

नवी दिल्ली - राजस्थानमधील कोटा येथून खासदार असलेले ओम बिर्ला लोकसभेचे नवीन अध्यक्ष होणार आहेत. सर्वांच्या सहमतीनुसार ओम बिर्ला आज अध्यक्षपदाचा अर्ज दाखल करणार आहेत. बुधवारी मतदानाची औपचारिक प्रकिया पार पडल्यानंतर ते लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्षपद देण्याच्या निर्णय आश्चर्यचकीत करणार आहे. याआधी केंद्रीय पातळीवर ओम बिर्ला यांचे नाव कधीही चर्चेत नव्हते. ओम बिर्ला यांनी याआधी अनेक संसदीय समित्यांचे काम पाहिले आहे. त्यांचे अनेक नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. अमित शाह यांच्या जवळचे म्हणून त्यांना ओळखले जाते. राजस्थानमध्ये भाजपचे पूनर्गठन करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यांनी राजस्थान सरकारमध्ये संसदीय सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. या सर्वांचा त्यांना फायदा झाल्याचे सांगितले जात आहे.

ओम बिर्ला यांचा ४ डिसेंबर १९६२ साली जन्म झाला होता. त्यांनी महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठातून त्यांनी पदव्यूत्तर पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर, १९७९ साली ते विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बनले. सक्रीय राजकारणात उतरल्यानंतर ते भारतीय जनता युवा मोर्चासाठी काम करू लागले. बिर्ला पहिल्यांदा प्रदेश अध्यक्ष बनले. यानंतर, ते राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले. २००३ साली भाजपच्या तिकिटावर ते २००३ साली कोटा येथून आमदार झाले. यानंतर, २००८ आणि २०१३ सालीही ते आमदार म्हणून निवडून आले. २०१४ साली पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवताना त्यांनी काँग्रेसच्या इजियाराज सिंह यांना २ लाखांपेक्षा जास्त मतांनी हरवले होते. तर, २०१९ साली त्यांनी रामनारायण मीना यांचा अडीच लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला.

संसदीय समित्यांचे सदस्यत्व

२०१४ साली पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर ओम बिर्ला यांना संसदेच्या अनेक समित्यांचे सदस्य बनवण्यात आले होते. प्राक्कलन समिती, याचिका समिती, ऊर्जा संबंधित स्थायी समिती, सल्लागार समिती इत्यादी समित्यांचे ते सदस्य होते.

रुग्णांसाठी केले आहे विशेष कार्य

बिर्ला यांनी रुग्णांसाठी विशेष कार्य केले आहे. त्यांनी कोटा मतदारसंघात गरीब, वृद्ध, अपंग आणि असहाय्य महिलांना सतत मदत केली आहे. विविध सामाजिक संघटनेंच्यावतीने त्यांनी अपंग, कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि इतर विविध आजार असलेल्या रुग्णांना सर्वात पुढे राहुन मदत केली आह. अपंगांना सायकल, वृद्धांना व्हीलचेअर आणि मुकबधिरांना कानाच्या मशीनींचे वाटपही केले आहे.

वैयक्तीक जीवन

ओम बिर्ला हे वैश्य समाजाचे आहेत. पत्नी डॉ. अमिता बिर्ला यांनी वैद्यकीय शिक्षणात पदवी घेतली आहे. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details