महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देव तारी त्याला कोण मारी : अंगावरून रेल्वे जाऊनही 'ती' बचावली, पाहा व्हिडिओ - सीसीटीव्ही

रेल्वे स्थानकावर एका वृद्ध महिलेच्या अंगावरून रेल्वे जाऊनही ती बचावली आहे.

देव तारी त्याला कोण मारी

By

Published : Aug 24, 2019, 5:12 PM IST

रांची - रेल्वे स्थानकावर एका वृद्ध महिलेच्या अंगावरून रेल्वे जाऊनही ती बचावली आहे. ही घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवाने ट्रेनचा वेग कमी असल्याने या वृद्ध महिलेचा जीव वाचला.

रेल्वे स्थानकावर एका वृद्ध महिलेच्या अंगावरून रेल्वे जाऊनही ती बचावली आहे.


रांची-लोहरदगा रेल्वेमधून उतरताना एक वृद्ध महिला घसरली आणि रेल्वे रुळावर पडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय की, तिच्या अंगावरुन रेल्वे जाते. मात्र तिला साधं खरचटलंही नाही. त्याचवेळेस फलाटावर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी त्या महिलेला फलटावरून वरती येण्यास मदत केल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.


यापूर्वीही या स्थानकावर अशा घटना घडल्या आहेत. मात्र त्या अपघातामध्ये त्या व्यक्तींचा मृत्यू झाला होता. अशा घटना संबधित अनेक सुचना रेल्वे प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. मात्र त्यावर प्रशानसनाने कोणतेही पाऊल उचललेले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details