महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

९३ पाकिस्तानी हिंदूंनी पुरी येथील जगन्नाथ मंदिराला दिली भेट - odisha

इस्लामाबाद, कराची, बलुचिस्तान आणि पाकिस्तानातील आणखी ठिकाणांहून हे हिंदू आले होते. भुवनेश्वर येथील ओंकारनाथ मिशनने भेटीदरम्यानच्या त्यांच्या कार्यक्रमांची व्यवस्था केली होती.

९३ पाकिस्तानी हिंदूंची जगन्नाथ मंदिराला भेट

By

Published : May 28, 2019, 10:48 AM IST

भुवनेश्वर - पाकिस्तानातील हिंदूंच्या ९३ प्रतिनिधींनी सोमवारी ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ मंदिराला भेट दिली. त्याआधी त्यांनी हरिद्वारला भेट दिली. इस्लामाबाद, कराची, बलुचिस्तान आणि पाकिस्तानातील आणखी ठिकाणांहून हे हिंदू आले होते. भुवनेश्वर येथील ओंकारनाथ मिशनने भेटीदरम्यानच्या त्यांच्या कार्यक्रमांची व्यवस्था केली होती.

मिशनचे संस्थापक किंकर विठ्ठल रामानुज महाराजांनी 'हा आमच्याकडून जगाला शांततेचा संदेश आहे,' असे म्हटले आहे. 'पाकिस्तानातील इस्लामाबाद, कराची, बलुचिस्तान आदी ठिकाणांहून हे हिंदू भारतात आले होते. विविध हिंदू धार्मिक स्थळांना भेटी देणे हा आमच्या भारतभेटीचा उद्देश होता. दोन्ही सरकारे आपापल्या बाजूंना शांतता प्रस्थापित करतील, अशी आशा आहे. यामुळे दोन्ही देशांतील लोकांना दोन्ही देशांमध्ये प्रवास करता येईल,' असे या प्रतिनिधींपैकी साई आत्मा राम यांनी म्हटले आहे.

'आम्हाला एका महिन्याचा विविध धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी व्हिजिट व्हिसा मिळाला आहे. आम्ही हरिद्वार आणि हृषिकेशला गेलो. आता मथुरा आणि वृंदावनला जाणार आहोत,' असे आणखी एका व्यक्तीने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details