महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ओडिशात लोकसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण - मुख्यमंत्री पटनाईक

राहुल गांधी यांनी ओडिशाचा दौरा केल्यानंतर एका दिवसानंतरच पटनाईक यांनी ही घोषणा केल्यामुळे काँग्रेसला ओडिशात फटका बसू शकतो. वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री हेमानंद विश्वाल यांची मुलगी सुनीता विश्वाल यांनी शनिवारी बीजेडीमध्ये प्रवेश केला होता.

मुख्यमंत्री नवीन पटनाईक

By

Published : Mar 10, 2019, 3:34 PM IST

Updated : Mar 10, 2019, 4:45 PM IST

भुवनेश्वर - ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनाईक यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची घोषणा केली आहे. राज्यात हे आरक्षण लागू केले जाणार आहे.

'मी आज केंद्रपाडा येथे आल्याने आनंदित झालो आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची घोषणा करत आहे,'असे पटनाईक यांनी म्हटले.

राहुल गांधी यांनी ओडिशाचा दौरा केल्यानंतर एका दिवसानंतरच पटनाईक यांनी ही घोषणा केल्यामुळे काँग्रेसला ओडिशात फटका बसू शकतो. वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री हेमानंद विश्वाल यांची मुलगी सुनीता विश्वाल यांनी शनिवारी बीजेडीमध्ये प्रवेश केला होता.

Last Updated : Mar 10, 2019, 4:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details