नवी दिल्ली- राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा प्रदूषण समस्येमुळे सम विषम वाहन क्रमांक योजना लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मात्र, ही योजना फक्त दिवाळीनंतर ४ ते १५ नोव्हेंबर दरम्यान लागू असणार आहे. त्यानुसार दिल्लीमध्ये आता ६ दिवस सम क्रमांकाच्या आणि ६ दिवस विषम क्रमांकाच्या गाड्या रस्त्यावर धावणार आहेत.
सम गाड्यांना ठरवून दिलेल्या दिवशी विषम क्रमांकाच्या गाड्या चालवण्यास बंदी असेल. ४ नोव्हेंबरला सम क्रमांकाच्या गाड्या रस्त्यावर धावतील. जसे की - (२, ४, ६, ८, १०) तर ५ नोव्हेंबरला विषम क्रमांकाच्या गाड्यांना परवानगी असेल, जसे की - (३,५,७,९,११) या क्रमांकाच्या गाड्याच रस्त्यावर धावतील.