नवी दिल्ली - दिल्लीमध्ये वातावरणातील वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारने गाड्यांची ऑड-इव्हन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच 'सम' तारखेला 'सम' क्रमांकाच्या गाड्या रस्त्यावर धावतील तर, 'विषम' तारखेला 'विषम' क्रमांकाच्या गाड्या धावतील. आजपासून ही प्रणाली लागू झाली असून आज ४ तारीख असल्याने 'सम' क्रमांकाच्या गाड्या रस्त्यावर चालवण्याची परवानगी राहील.
दिल्लीत आजपासून ऑड-इव्हन प्रणाली लागू, आज 'सम' क्रमांकाच्या गाड्या धावणार
'सम' तारखेला 'सम' क्रमांकाच्या गाड्या रस्त्यावर धावतील तर, 'विषम' तारखेला 'विषम' क्रमांकाच्या गाड्या धावतील. आजपासून ही प्रणाली लागू झाली असून आज ४ तारीख असल्याने 'सम' क्रमांकाच्या गाड्या रस्त्यावर चालवण्याची परवानगी राहील.
दिल्लीत आजपासून ऑड-इव्हन प्रणाली लागू
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याविषयी ट्विट केले आहे. 'नमस्ते दिल्ली! प्रदूषण कमी करण्यासाठी आजपासून Odd-Even सुरू होत आहे. स्वतःसाठी आणि आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी तसेच, कुटुंबीयांच्या श्वासासाठी Odd-Even प्रणालीचे नक्की पालन करावे. आपल्या चारचाकी इतरांसोबत शेअर करा. यामुळे मैत्री वाढेल, नवी नाती नयार होतील, पेट्रोल वाचेल आणि प्रदूषणही कमी होईल. दिल्ली पुन्हा एकदा करून दाखवेल,' असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.