नवी दिल्ली- प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी ऑड इव्हन म्हणजेच गाड्यांची सम-विषम योजना उपयोगी ठरेलच असे नाही. तसेच दिल्लीतील नागरिकांनी श्वास कसा घ्यायचा? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला विचारला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल सरकारच्या ऑड-इव्हन योजनेवर प्रश्वचिन्ह उपस्थित केले.
दिल्लीतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रदूषण कमी झाले नाही तर सम-विषम प्रणाली १८ नोव्हेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे दिल्लीचे मुख्यंमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. कारमुळे ३ टक्के प्रदूषण होते, तर सर्व वाहनांमुळे २८ टक्के प्रदूषण होते, असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज(शुक्रवारी) सर्वोच्च न्यायालयात सांगितले. दिल्लीमधील हवा प्रदूषण गंभीर पातळीवर पोहोचले आहे. हवेचा निर्देशांक ६०० अकांवर पोहोचला आहे. लोकांनी श्वास कसा घ्यायचा. कसा सवाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला विचारला आहे. तसेच हवा शुद्धीकरण टॉवर संपूर्ण शहरामध्ये बसवण्याबाबत योजना तयार करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत.मागील काही दिवसांपासून दिल्ली मधील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे दिल्ली आणि आजूबाजूचा प्रदेशातील शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्याची वेळ येत आहे. नागरिकांना मास्क घालून घराच्या बाहेर पडावे लागत आहेत. खराब हवेमुळे श्वसनाचे आजार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक भागात हवेचा स्तर ५०० निर्देशांकाच्या वर आहे.