महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'मी जन्मत:च मुस्लीम आणि आताही मुस्लीमच आहे'

नुसरत म्हणाली, मी असल्या फतव्यांची काळजी करत नाही. मी त्यांच्याकडे लक्षही देत नाही. मी जन्मत:च मुस्लिम आहे आणि आजही मुस्लिमच आहे.

तृणमूल काँग्रेस खासदार नुसरत जहां

By

Published : Jul 4, 2019, 4:02 PM IST

नवी दिल्ली -तृणमूल काँग्रेस खासदार नुसरत जहां विरोधात काही दिवसांपूर्वी देवबंद या संघटनेने हिंदु परंपरेप्रमाणे कुंकु लावल्यामुळे आणि मंगळसूत्र घातल्यामुळे फतवा काढला होता. नुसरत जहां यांनी फतव्यांवर कडवी प्रतिक्रिया दिली आहे.

जगन्नाथांची पूजा करण्यासाठी आलेली नुसरत म्हणाली, मी असल्या फतव्यांची काळजी करत नाही. मी त्यांच्याकडे लक्षही देत नाही. मी जन्मत:च मुस्लीम आहे आणि आजही मुस्लीमच आहे. मी एका हिंदुशी विवाह केला आहे. तरीही मी मुस्लीमच आहे. असल्या गोष्टींकडे लक्ष देऊन काहीही होणार नाही.

काही दिवसांपूर्वी नुसरतने तुर्की येथे हिंदु व्यापाऱ्याशी विवाह केला होता. यानंतर पश्चिम बंगालमधून खासदार असलेल्या नुसरत यांनी संसदेत हजेरी लावली होती. संसदेत उपस्थित राहताना नुसरत हिंदु परंपरेनुसार कपाळाला कुंकु आणि गळ्यात मंगळसूत्र घालून आली होती. यावर देवबंदने फतवा काढताना नुसरतच्या कुंकु लावण्याला आणि मंगळसुत्राला विरोध केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details