नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतातील कोरोना रुग्णांची अद्ययावत यादी जाहीर केली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत १४७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण झाले आहे. १२२ भारतीय नागरिकांचा तर २५ परदेशी नागरिकांचा यामध्ये समावेश आहे.
भारतामध्ये कोरोनाचे १४७ रुग्ण; महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वात जास्त बाधित - केंद्रीय आरोग्य मंत्रालय
महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त म्हणजे ४१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याखालोखाल केरळ, उत्तरप्रदेश आणि कर्नाटकात अनुक्रमे २७, १६ आणि ११ जणांना लागण झाली आहे.
महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त म्हणजे ४१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याखालोखाल केरळ, उत्तरप्रदेश आणि कर्नाटकात अनुक्रमे २७, १६ आणि ११ जणांना लागण झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये १० तर लडाख केंद्रशासित प्रदेशात ८ जणांना बाधा झाली आहे. इतर राज्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. सर्वांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. तर अनेक देशांतून भारतात येण्याजाण्यास बंदी घालण्यात आली आहे. चीननंतर युरोपात कोरोनाने थैमान घातले आहे. इटलीमध्ये सर्वात जास्त जणांना कोरोनाची लागण झाली असून मृत्यू दर वाढला आहे.