महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

के-4 सबमरीन लॉन्चड बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी - के-4  सबमरीन लॉन्चड बॅलेस्टिक क्षेपणास्त्र

अणुपाणबुडीमध्ये वापरण्यासाठी तयार केलेल्या के-4 सबमरीन लॉन्चड बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) के - 4 क्षेपणास्त्राची निर्मिती केलेली आहे.

के-4 सबमरीन लॉन्चड बॅलेस्टिक क्षेपणास्त्र
के-4 सबमरीन लॉन्चड बॅलेस्टिक क्षेपणास्त्र

By

Published : Jan 19, 2020, 8:42 PM IST

नवी दिल्ली - अणुपाणबुडीमध्ये वापरण्यासाठी तयार केलेल्या के-4 सबमरीन लॉन्चड बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. 3 हजार 500 किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष्यभेद करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची रविवारी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर चाचणी झाली.

हेही वाचा - बिहारमध्ये जगातील सर्वात मोठी मानवी साखळी; ४ कोटी २७ लाख नागरिकांचा सहभाग

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) के - 4 क्षेपणास्त्राची निर्मिती केलेली आहे. भारतीय बनावटीची अणुपाणबुडी अरिहंतसाठी या क्षेपणास्त्राची खास निर्मिती करण्यात आली असून यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे. के - 4 क्षेपणास्त्र प्रत्यक्षात अरिहंत पाणबुडीवर लावण्या अगोदर आणखी चाचण्या घेण्यात येणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details