महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 16, 2019, 7:52 PM IST

ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशातही 'एनआरसी' लागू होणार

उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी एनआरसी कायदा लागू करण्याचे संकेत उत्तर प्रदेशचे ऊर्जामंत्री आणि सरकारचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी दिले आहेत.

ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा

लखनौ- आसामनंतर आता उत्तर प्रदेशातही राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) कायदा लागू करण्याच्या आदित्यनाथ सरकार विचारात आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील सर्व शहरातून घुसखोरांना सरकार घरचा मार्ग दाखवणार आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच या कायदे केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशातही 'एनआरसी' लागू होणार

हेही वाचा - परिस्थिती पूर्वपदावर आणा; काश्मीर दौऱ्यासाठी आझादांना सर्वोच्च न्यायालयाकडून आझादी

उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी एनआरसी कायदा लागू करण्याचे संकेत उत्तर प्रदेशचे ऊर्जामंत्री आणि सरकारचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी दिले.

हेही वाचा - हजारो प्रेक्षकांनी अनुभवला वार्षिक रेगट्टा स्पर्धेचा थरार

श्रीकांत शर्मा यावेळी म्हणाले, घुसखोरांविषयी सरकार कठोर पावले उचलणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात एनआरसीची अंमलबजावणी करण्यात येईल. कारण, हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. केंद्र सरकारनेही उत्तर प्रदेशात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या घुसखोरांविरोधात मोहीम राबविली आहे. घुसखोरांच्या विरोधात कारवाईच्या दृष्टीने एनआरसी लागू करण्यात येईल, असे शर्मा यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details