नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. त्यामुळे अनेक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. यातच झारखंडमधील साहिबगंज येथील रुग्णालयात कोरोनाग्रस्तांची सेवा करण्यासाठी दोन रोबोट ठेवण्यात आले आहेत.
रुग्णालयात कोरोनाग्रस्तांची सेवा करणार धनवंतरी अन् सावित्री हे दोन रोबोट
झारखंडमधील साहिबगंज येथील रुग्णालयात कोरोनाग्रस्तांची सेवा करण्यासाठी दोन रोबोट ठेवण्यात आले आहेत. धनवंतरी रोबोट कोरोनाबाधित रुग्णांना अन्न-पाणी आणि औषध देईल, तर सावित्री हे रोबोट रुग्णालयातील सर्व कक्षांचे निर्जंतुकीकरण करणार आहे.
शहरातील राजमहल अनुमंडल रुग्णालयात रुग्णांची सेवा करण्यासाठी दोन रोबोट ठेवण्यात आले आहेत. धनवंतरी आणि सावित्री असे या दोन्ही रोबोटची नावे आहेत. धनवंतरी रोबोट कोरोनाबाधित रुग्णांना अन्न-पाणी आणि औषध देईल, तर सावित्री हे रोबोट रुग्णालयातील सर्व कक्षांचे निर्जंतुकीकरण करणार आहे.
रोबोटमध्ये टॅब लावण्यात आलेले असून ते रिमोटवर संचलीत आहेत. यामध्ये कॅमेराही लावलेला आहे. ज्यामुळे डॉक्टर आणि रुग्णांमध्ये संवाद होऊ शकतो. या रोबोटमध्ये बॅटरी असून त्याला वेळो-वेळी चार्ज करण्याची गरज आहे. या रोबोटमुळे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण कमी होईल.