एक्झिट पोलच्या अंदाजानंतर सर्व विरोधक 'राजकीय आयसीयू'मध्ये गेलेत - गिरीराज सिंह - prediction
'ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबू नायडूंसह सर्व विरोधक सध्या 'राजकीय आयसीयू'मध्ये जाऊन पोहोचले आहे. त्यांनी स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. २३ मेनंतर या सर्व विरोधकांनी त्यांचे भविष्य चांगले करण्यासाठी आत्मपरीक्षण करावे,' असे सिंह यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली - भाजपचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी एक्झिट पोलच्या अंदाजानंतर सर्व विरोधक 'राजकीय आयसीयू'मध्ये गेलेत, असे म्हटले आहे. बहुतेक एक्झिट पोल्सनी भाजप-प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच सरकार पुन्हा एकदा सत्तेत येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. ५४३ सदस्यांच्या लोकसभेत भाजपला बहुमत मिळण्याची भाकिते वर्तवण्यात आली आहेत.
गिरीराज सिंह यांनी ट्विट करत सर्व विरोधकांना टोला लगावला आहे. 'ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबू नायडूंसह सर्व विरोधक सध्या 'राजकीय आयसीयू'मध्ये जाऊन पोहोचले आहे. त्यांनी स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. २३ मेनंतर या सर्व विरोधकांनी त्यांचे भविष्य चांगले करण्यासाठी आत्मपरीक्षण करावे,' असे सिंह यांनी म्हटले आहे. दरम्यान, सर्व विरोधकांनी एक्झिट पोलने व्यक्त केलेले अंदाज चुकीचे असल्याचे म्हटले आहे.