बंगळुरू - प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी देशभरामध्ये विविध अभियान राबवले जात आहेत. मात्र, तरीही लोकांमध्ये पाहिजे तेवढी जागरुकता झालेली नाही. अजूनही प्लास्टिकचा सर्रास वापर केला जातो. कर्नाटकमधील नितीन वास यांनी प्लास्टिक मुक्त भारत करण्याचा विडा उचलला आहे.
मंगळुरू जिल्ह्यामधील पर्यावरणवादी असलेल्या नितिन वास नावाच्या व्यक्तीने प्लास्टिक मुक्त भारत करण्यासाठी आनोखा उपक्रम राबवला आहे. आपण दात स्वच्छ करण्यासाठी प्लास्टिकपासून बनलेल्या ब्रशचा वापर करतो. प्लास्टिकपासून बनलेल्या टूथब्रशच्या ऐवजी नितीन वास यांनी लाकडापासून टूथब्रश बनवला आहे. तसेच नारळ पिण्यासाठी प्लास्टिकचे स्ट्रॉ ऐवजी त्यांनी कागदाचा वापर करून स्ट्रॉ तयार केले आहेत.