हावडा(पश्चिम बंगाल) - राज्यातील पेट्रोल पंपांवर जे लोक वाहनांची टाकी भरण्यासाठी रांगा लावतात त्यांच्यासाठी हा मोठा आणि स्पष्ट संदेश आहे.
मास्क न लावता गेल्यास पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल पंपावर मिळणार नाही इंधन - कोरोना न्यूज
राज्यभरातील पेट्रोल पंपावर जर वाहनचालक मास्क न लावता आले, तर आजपासून त्यांना इंधन मिळणार नाही, असा निर्णय पश्चिम बंगाल पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने घेतला आहे.
राज्यभरातील पेट्रोल पंपावर जर वाहनचालक मास्क न लावता आले, तर आजपासून त्यांना इंधन मिळणार नाही, असा निर्णय पश्चिम बंगाल पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने घेतला आहे.
आम्ही लॉकडाऊन संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयावर लक्ष ठेवले होते. ज्याप्रमाणे पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा अधिक धोका असतो, त्याचप्रमाणे आमच्या कर्मचाऱ्यांचाही वारंवार ग्राहकांशी संपर्क येतो. आपल्याला माहित नसते की कुणाला कोरोनाची लक्षणे आहेत आणि कुणाला नाही. म्हणूनच, लॉकडाऊन वाढविल्यानंतर आम्ही 'नो मास्क, नो फ्यूल' हा नियम काटेकोरपणे लागू करण्याचा निर्णय घेतला. ही आमच्या कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी आमची पहिली पायरी आहे, असे असोसिएशनचे हावडा जिल्हा सचिव प्रसेनजित सेन यांनी सांगितले.