बंगळुरु- देशात 24 तासात 896 कोरोनाचे रुग्ण वाढले असताना कर्नाटकातील तुरुवेकेरे विधानसभा मतदारसंघाचे आमदार एम.एस.जयाराम यांनी तुमाकुरु जिल्ह्यातील एका गावात 51 वा वाढदिवस साजरा केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने याबाबत ट्विटरवर व्हिडीओ शेअर केल्यानंतर ही बाब समोर आली.
लॉकडाऊनमध्येही कर्नाटकातील भाजप आमदाराने साजरा केला वाढदिवस आमदाराच्या वाढदिवासाला 100 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते आणि यावेळी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यात आले नाही,अशी माहिती आहे.आमदाराचे कुटुंबिय, नातेवाईक आणि त्याचे समर्थक यांच्या उपस्थिती गुब्बी तालुक्यातील अंकलकुप्पे यागावातील घरातमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आल्याची माहिती गुब्बी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी.एम.नागराज यांनी वृतसंस्थांना फोनवरुन दिली.
बंगळुरुपासून उत्तरेकडे 120 किलोमीटर अतंरावर तुमाकुरु जिल्ह्यात गुब्बी तालुका आहे. आमदाराच्या वाढदिवसासोबतच हुनमान जंयतीचा कार्यक्रम मनीकुप्पे गावातील अंजनेय स्वामी मंदिरात साजरा करण्यात आला. इथे जमलेल्या लोकांना अन्नाची पॅकेटस वाटण्यात आली. पोलीस निरीक्षक नागराज यांनी आमदाराच्या वाढदिवसामुळे लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा इन्कार केला आहे. मनीकुप्पा गावामध्ये मोफत अन्नाची पॅकेटस वाटण्यात आली असेही पोलिसांनी सांगितले
कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटकाळात राजकिय नेत्यांनी निष्काळजीपणा दाखवल्याची ही पहिली घटना नाही. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी देखील एका लग्न सोहळ्यात हजेरी लावल्याचे समोर आले होते. कर्नाटकातील कोरोनाबाधितांचा आकडा 200 पेक्षा जास्त झाला आहे.