जयपूर - राजस्थानमध्ये सत्ता संघर्ष सुरू आहे. राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे आणि काँग्रेस नेते अजय माकन यांच्यासमवेत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी जयपूर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. राजस्थानात काँग्रेसचे सरकार स्थिर आहे. तसेच राज्य सरकार पाडण्याचे भाजपचे षडयंत्र यशस्वी होणार नाही. आमचे सरकार 5 वर्षांची मुदत पूर्ण करेल, असे सुरजेवाला म्हणाले
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आज सर्व काँग्रेसच्या आमदारांनी भाग घ्यावा आणि राज्यात आपले सरकार अधिक मजबूत करावे, असे आवाहन सुरजेवाला यांनी केले. पक्ष संभाषणासाठी खुला आहे आणि सदस्यांनी त्यांच्या समस्या पक्षाच्या व्यासपीठावर मांडल्या पाहिजेत. कुटुंबात उद्भवणारी कोणतीही समस्या कुटुंबातच सोडवली पाहिजे, असेही ते म्हणाले.