शिलाँग - भारतात कोरोना पाठोपाठ आता आफ्रिकी स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला आहे. दरम्यान, आफ्रिकी स्वाईन फ्लूचे एकही प्रकरण राज्यात आढळले नसल्याचे मेघालयचे उपमुख्यमंत्री प्रिस्टोन तिनसाँग यांनी सांगतिले. दरम्यान आसामध्ये 306 गावांमध्ये 2 हजार 500 डुक्करांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील दोन जिल्ह्यामध्ये 5 डुक्करांचा आफ्रिकी स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची बातमी पसरली होती. या बातमीचे त्यांनी खंडन केले. आफ्रिकी स्वाईन फ्लूचे एकही प्रकरण राज्यात आढळले नसून आम्ही 25 नमुने तपासनसाठी पाठवले आहेत. त्यापैकी 8 नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर उर्वरित अहवाल अद्याप येणे बाकी असल्याचे प्रिस्टोन तिनसाँग यांनी सांगितले.
आफ्रिकन स्वाइन फ्ल्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मेघालय पशुवैद्यकीय विभागाला सतर्क केले असून इतर राज्यांमधून डुकरांच्या खरेदीवर बंदी घातली आहे. तसेच जनावरांच्या आंतरजिल्हा वाहतुकीवरही बंदी घातली आहे. डुक्करांमध्ये आफ्रिकी स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यास तातडीने प्रशासनाला कळवावे, असे आदेश अधिकाऱयांनी डुक्करांचे पालन करणाऱयांना दिले आहेत.
दरम्यान आसाममार्गाने आफ्रिकी स्वाईन फ्लू भारतात दाखल झाला आहे. आसाममधील 306 गावांमध्ये 2 हजार 500 डुक्करांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशू रोग संस्थान (एनआयएचएसएडी), भोपाळने आसाममधील डुक्कारांना अफ्रीकी स्वाइन फ्लू (एएसएफ) असल्याचे सांगितले आहे. राज्य विभागाच्या 2019 च्या जनगणनेनुसार आसाममधील डुक्करांची संख्या 21 लाख होती, परंतु अलिकडच्या काळात ती 30 लाखांवर गेली आहे.