नवी दिल्ली - देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली जनमताचा कौल घ्यावा, अशी मागणी बॅनर्जी यांनी केली होती. त्यावर टीका करत 'बॅनर्जी यांना भारतीय संस्थांवर विश्वास नाही का?', असा सवाल सितारामन यांनी केला.
एका राज्याच्या मुख्यमंत्री पदी असलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करू नये. मी पूर्णपणे त्यांच्या वक्तव्याचा निषेध करते. त्यांचे हे वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. भारताने कधीच आपल्या अंतर्गत प्रश्नांमध्ये कोणत्याचा तिसऱ्या पक्षाचा किंवा सस्थांनाचा हस्तक्षेप स्वीकार केला नाही. अंतर्गत प्रश्नांमध्ये बॅनर्जी यांनी संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप करण्याचे वक्तव्य केले आहे. त्यांना भारतीय संस्थावर विश्वास नाही का?, असा प्रश्न सितारामन यांनी उपस्थित केला. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे 70 वर्षांपासून प्रतिक्षा करत असलेल्यांना नागरिकत्व देणार आहे. त्यामुळे ती लोक सन्मानाने जगू शकतील. या कायद्याचा देशातील सध्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा काहीच संबंध नाही, असे सितारामन यांनी सांगितले.
हेही वाचा -7 पाकिस्तानी हिंदू शरणार्थींना मिळाले भारतीय नागरिकत्व
बॅनर्जी यांनी गुरुवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर संयुक्त राष्ट्र किंवा राष्ट्रीय मानवधिकार आयोगासारख्या संस्थेच्या देखरेखीखाली जनमताचा कौल घ्यावा, अशी मागणी केली होती. नागरिकत्व सुधारणा कायद्यावर देशामधील लोकांचा संयुक्त राष्ट्र किंवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासारख्या संस्थेच्या देखरेखीखाली कौल घ्यावा. त्यामुळे किती लोक कायद्याच्या पक्षात तर किती लोक विरोधामध्ये आहेत, हे स्पष्ट होईल, असे त्या म्हणाल्या होत्या.
हेही वाचा -'या' चार देशांच्या नागरिकांना भारतातील पर्वतशिखरांवर गिर्यारोहणासाठी परवानगी आवश्यक