Video: निर्भया बलात्कार प्रकरणाचा थोडक्यात घटनाक्रम... - Seema Kushwaha
दिल्लीमध्ये 16 डिसेंबर 2012 ला घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देश रस्त्यावर उतरला होता. तेव्हापासून दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी निर्भयाचे कुटुंबीय आणि संपुर्ण देश वाट पाहत होता. आज अखेर तो दिवस उजाडला.
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये 16 डिसेंबर 2012 ला घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देश रस्त्यावर उतरला होता. तेव्हापासून दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी निर्भयाचे कुटुंबीय आणि संपुर्ण देश वाट पाहत होता. आज अखेर तो दिवस उजाडला. निर्भयाच्या गुन्हेगारांची फाशी वाचवण्यासाठी दोषींच्या वकिलांनी अखेरच्या क्षणापर्यंत खेळलेले डावपेच अखेर निष्फळ ठरले आहेत. रात्री तीनच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी दोषींचे वकील एपी सिंह यांनी केलेले सर्व दावे फेटाळून लावले. त्यामुळे आता नियोजित वेळेप्रमाणे पहाटे साडेपाच वाजता निर्भयाच्या गुन्हेगारांना फासावर लटकवण्यात आले. संपूर्ण देशाला हादवणारे हे निर्भया बलात्कार प्रकरण नेमके काय होते थोडक्यात...