हैदराबाद : जग कोरोना विषाणूच्या वाढत्या संकटाला तोंड देत असताना, कोविड-१९च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी गिलियड सायन्सेचेसचे विषाणू प्रतिबंधक औषध रेमडेसिवीर आणि अँटी इंफ्लेमेटरी / दाह विरोधी उपचारपद्धती 'बॅरिकिटिनीब'च्या एकत्रित उपचाराला मान्यता देण्यात आली असून त्याचा रुग्णावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी अभ्यास सुरु केला असल्याचे अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने (एनआयएच) म्हटले आहे.
कोविड-१९वर उपचार घेत असलेल्या अमेरिकेतील प्रौढांवर ही चाचणी घेण्यात येणार असून त्यासाठी १,००० पेक्षा जास्त रुग्णांचा अभ्यास करण्यात येणार आहे.
कोविड-१९मुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण रोखण्यासाठी तसेच रेमडेसिवीर आणि 'बॅरिकिटिनीब'च्या एकत्रित उपचार पद्धतीने आणखी काही फायदे मिळतात का ते ह्या चाचणीच्या माध्यमातून तपासण्यात येणार असल्याचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अॅन्ड इन्फेइन्फेक्शस डिसिसीजचे संचालक अँथनी फॉसी यांनी म्हटले आहे.
रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांपैकी रेमडेसिवीरचे औषध दिलेले रुग्ण इतर रुग्णांच्या तुलनेत लवकर बरे होत असल्याबद्दल ठोस डेटा उपलब्ध असल्याचे फॉसी यांनी म्हटले आहे.
तसेच एलि लिलि कंपनीच्या ओलुमियंट या ब्रँड खाली उपचार करण्यात येत असलेले 'बॅरिकिटिनीब' कोविड १९च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रभावी उपचार पद्धती म्हणून पुढे येत आहे.