महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 2, 2020, 1:15 PM IST

ETV Bharat / bharat

देविंदर सिंग अटकेप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलीस आणि एनआएयचे छापे

दहशतवाद्यांशी संबध असल्याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंग अटकेत आहेत. पोलिसांनी आणि एनआयएने या प्रकरणी आणखी छापे मारले आहेत.

देविंदर सिंग, DSP Davinder Singh
देविंदर सिंग

नवी दिल्ली - दहशतवाद्यांशी संबध असल्याप्रकणी जम्मू-काश्मीर पोलीस दलातील उपअधीक्षक देविंदर सिंग यांना मागील महिन्यात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी काश्मीर पोलीस आणि एनआयएने आणखी ठिकाणी छापे मारले आहेत. नक्की किती ठिकाणी आणि कोठे छापे मारले, याबाबतची माहिती मिळू शकली नाही.

देविंदर सिंग याला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी छापे मारले होते. तसेच या प्रकरणाचा तपास जम्मू-काश्मीर पोलिसांकडून काढून एनआयएला देण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणाही या प्रकरणी तपास करत आहेत. दहशतवाद्यांना आपल्या कारमध्ये घेऊन जात असताना देविंदर सिंग याला सापळा रचून अटक करण्यात आली होती. उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचे दहशतवाद्यांशी संबध असल्याने देशभर याविषयी चर्चा झाली होती.काय आहे प्रकरण ?देविंदर सिंग पोलीस उपनिरीक्षक म्हणून जम्मू काश्मीर पोलीस दलात कार्यरत होता. मात्र, काही अवधीतच पोलीस उपअधीक्षक पदापर्यंत मजल मारली होती. घातपात विरोधी पथकामध्ये उत्तम काम केल्यामुळे सिंग याला गौरवण्यातही आले होते. मात्र, सिंग याचे दहशतवाद्यांशी संबध असल्याचे उघड झाले आहे.सिंग याला जानेवारी महिन्यात २ दहशतवाद्यांना कारमध्ये जम्मूला घेवून जाताना अटक करण्यात आली. कुख्यात दहशतवादी नावेद बाबा याला शोपिया जिल्ह्यातून जम्मू येथे घेवून जात असताना सिंग यांना पकडण्यात आले. ११ नागरिकांना मारल्याप्रकरणी नावेद पोलिसांना हवा होता. काश्मीरातील व्यापारी, ट्रक ड्रायव्हर, कामगार यांना नावेदने मारले आहे. सिंग याने नावेद आणि त्याच्या सहकाऱ्याला जम्मू आणि शोपिया येथील घरी आश्रय दिल्याचेही तपासात पुढे आले आहे. अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत आणि घरी मारलेल्या छाप्यात पोलिसांना शस्त्रास्त्रेही आढळून आली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details