२०२१ मध्ये होणार पुढील जनगणना; गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारी
जनगणनेसाठी १ मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड या बर्फाच्छादित भागांसाठी संदर्भ वेळ १ ऑक्टोबर २०२० रात्री १२ पर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - देशातील १६व्या जनगणनेसाठी सरकारने अधिसूचना जारी केली आहे. देशात २०२१ मध्ये जनगणना होईल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले आहे. जनगणनेसाठी १ मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड या बर्फाच्छादित भागांसाठी संदर्भ वेळ १ ऑक्टोबर २०२० रात्री १२ पर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे. जनगणनेमध्ये लोकसंख्येशिवाय भाषा, आरोग्य, संस्कृती, धर्म, सामाजिक आणिआर्थिक स्थिती आदींबाबत आकडे गोळा केले जाणार आहेत. जणगणना दर १० वर्षांनी होते. यापूर्वीची जनगणना २०११ मध्ये झाली होती. २०११ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १२१ कोटी होती.