वॉशिंग्टन - अमेरिकेतील जॉर्जीया येथे पोलिसांना एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये नवजात मुलगी सापडली आहे. अमेरिकन पोलिसांनी या मुलीचे नाव इंडीया असे ठेवले आहे. त्या मुलीच्या आईचा शोध लावण्यासाठी मुलगी 'इंडिया'चा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
अमेरिकन पोलिसांना 6 जुन रोजी जंगलामध्ये एका बाळाचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. यानंतर तेथे पाहिले असता त्यांना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये नवजात मुलगी आढळून आली. पोलिसांच्या शरिरावर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यामध्ये बाळाचा व्हिडीओ रेकार्ड झाला आहे. हा व्हिडीओ पोलिसांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे.