नवी दिल्ली - देशातील विविध राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 24 हजार 248 नवीन कोरोना रुग्ण आढळल्याने चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. तर 425 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोनाची स्थिती चिंताजनक; मागील 24 तासांत तब्बल 24 हजारांहून अधिक बाधितांची नोंद - भारत कोरोना अपडेट
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख 97 हजार 413 वर पोहोचली आहे. यात 2 लाख 53 हजार 287 रुग्ण अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत.
भारत कोरोना अपडेट
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख 97 हजार 413 वर पोहोचली आहे. यात 2 लाख 53 हजार 287 रुग्ण अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. 4 लाख 24 हजार 233 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 19 हजार 693 रुग्णांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे.