महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कुंभमेळ्यात बुडणाऱ्या महिलेला वाचवणाऱ्या एनडीआरएफ जवानाचा मृत्यू

१९ फेब्रुवारीला माघी पौर्णिमेदिवशी राजेंद्र यांची संगम घाटावर ड्युटी होती. त्यांनी एका महिलेला बुडताना पाहिले. त्यांनी ताबडतोब पाण्यात उडी घेत या महिलेला वाचवले. मात्र, यादरम्यान त्यांना गंभीर इजा झाली. त्यांना पाण्याखाली कठीण वस्तूचा जोरदार मार बसला होता. २० तारखेला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात झाली होती.

कॉन्स्टेबल राजेंद्र गौतम

By

Published : Feb 23, 2019, 1:05 PM IST

नवी दिल्ली - कुंभमेळ्यात बुडणाऱ्या वयस्क महिलेला वाचवणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा (एनडीआरएफ) जवान कॉन्स्टेबल राजेंद्र गौतम यांचा मृत्यू झाला आहे. प्रयागराज येथे कुंभमेळ्यात संगम घाटावर स्नानासाठी गेलेली ही महिला चुकीने सुरक्षित अंतराच्या पुढे निघून गेली होती. तिला बुडण्यापासून वाचवताना राजेंद्र गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

१९ फेब्रुवारीला माघी पौर्णिमेदिवशी राजेंद्र यांची संगम घाटावर ड्युटी होती. त्यांनी एका महिलेला बुडताना पाहिले. त्यांनी ताबडतोब पाण्यात उडी घेत या महिलेला वाचवले. मात्र, यादरम्यान त्यांना गंभीर इजा झाली. त्यांना पाण्याखाली कठीण वस्तूचा जोरदार मार बसला होता. २० तारखेला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वरिष्ठ एनडीआरएफ अधिकारी आणि महासंचालकांच्या उपस्थितीत राजेंद्र यांना एनडीआरएफ मुख्यालयात आदरांजली वाहण्यात आली. राजेंद्र गौतम हे हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील लाहेर गावचे रहिवासी होते. ते सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ३० जानेवारी २००४ ला सेवेत आले होते. २०१३ पासून एनडीआरएफमध्ये कार्यरत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details