बालाघाट- येथील पौनी ग्रामपंचायतीच्या हद्दीत नक्षल्यांनी पत्रक लावल्याचे आढळून आले. यामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या सरकार विरोधात १८ सप्टेंबर (बुधवार)ला बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नक्षल्यांचा बुधवारी बंद पाळण्याचे आवाहन, बालाघाट येथे आढळली पत्रके
नक्षल्यांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या सरकार विरोधात १८ सप्टेंबर (बुधवार)ला बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. तसे पत्रक त्यांनी बालाघाट येथील पौनी ग्रामपंचायतीच्या हद्दीत टाकले आहे.
पत्रके
कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) म्हणजेच नक्षलवादी महाराष्ट्र, मध्यप्रदेश ,छत्तीसगडच्या विभागीय समितीने हे पत्रक छापले आहेत. ज्यामध्ये केंद्र व राज्य सरकारकडून होणाऱ्या जनविरोधी काम बंद करण्यासाठी आवाहन केले गेले आहे.
पत्रक मिळाल्यानंतर लांजीचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, नक्षल्यांच्या सर्व हलचालींवर कठोर नजर ठेवली जात असून सुरक्षेच्या दृष्टीने जवानांना सूचना देण्यात आली आहे.