...अखेर नवज्योत सिंग सिद्धू यांचा मंत्रिपदाचा राजीनामा - sidhu quits punjab cabinet
सिद्धू यांच्याकडे ऊर्जा आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभार एका महिन्यापूर्वीच सोपवण्यात आला होता. मात्र, सिद्धू यांचे खाते बदलण्यात आल्यानंतर त्यांची पदावरून अवनती झाल्याची भावना झाल्याने त्यांनी तो पदभार अद्याप स्वीकारला नव्हता.
नवज्योत सिंग सिद्धू
नवी दिल्ली - काँग्रेसचे पंजाब मंत्रिमंडळातील नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी अखेरीस मंत्रिपदाचा राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे दिला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी बऱ्याच काळापासून चाललेल्या वादानंतर त्यांनी हे पाऊल उचलले आहे. सिद्धू यांनी स्वतःच्या ट्विटरवरून १० जूनला दिलेले एका ओळीचे राजीनाम्याचे पत्र शेअर केले आहे. तसेच, लवकरच हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.