महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लॉकडाऊनमुळे चित्रकूटने घेतला मोकळा श्वास! - लॉकडाऊन पर्यावरण

लॉकडाऊनमुळे नागरिक घरांमध्ये बसून आहेत. उद्योगधंदे आणि सार्वजनिक वाहतूकही बंद आहेत. त्यामुळे दररोज होणारे प्रदूषण थांबले असून पर्यावरणावर याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. उत्तर प्रदेशातील चित्रकूट परिसरातील हवा शुद्ध झाली आहे.

chitrakoot
चित्रकूट

By

Published : Apr 24, 2020, 11:00 AM IST

लखनऊ(चित्रकूट) - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे दैनंदिन वाहतूक बंद आहे. याचा सकारात्मक परिणाम झाला असून प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात खाली घसरली आहे. उत्तर प्रदेशातील चित्रकूट परिसरातील हवा शुद्ध झाली आहे.

लॉकडाऊनमुळे चित्रकूटने घेतला मोकळा श्वास

लॉकडाऊनमुळे नागरिक घरांमध्ये बसून आहेत. उद्योगधंदे आणि सार्वजनिक वाहतूकही बंद आहेत. त्यामुळे दररोज होणारे प्रदूषण थांबले असून पर्यावरणावर याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. धार्मिक स्थळ असल्याने दररोज हजारो पर्यटक आणि भाविक चित्रकूटला भेट देतात. कोरोना लॉकडाऊनमुळे सध्या सर्व मंदिरे बंद आहेत. परिसरातून वाहणारी मंदाकिनी नदीचे प्रदूषण कमी झाले आहे. पाणीही काही प्रमाणात शुद्ध होताना दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details