नवी दिल्ली- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४५ जवान शहीद झाले. यानंतर देशाच्या सर्वच भागातून या भ्याड हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या. आता या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भारतातील अनेक राज्यांतील व्यापाऱ्यांनी आज बाजारपेठ बंदची घोषणा केली आहे.
पुलवामा हल्ला; आज 'या' राज्यांतील बाजारपेठ बंद ठेवण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय - दहशतवादी
पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज विविध राज्यातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, पंजाब, हरियाणा, जम्मू-कश्मीर आणि इतर राज्यांतील व्यापारीदेखील सहभागी होणार आहेत. व्यापाऱ्यांची प्रमुख संस्था कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) कडून या बंदची घोषणा करण्यात आली आहे.
यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, पंजाब, हरियाणा, जम्मू-कश्मीर आणि इतर राज्यांतील व्यापारीदेखील सहभागी होणार आहेत. व्यापाऱ्यांची प्रमुख संस्था कनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) कडून या भारत व्यापार बंदची घोषणा केली गेली आहे.
या संस्थेचे महासचिव प्रवीण खंडेलवाल म्हटले की, दिल्लीच्या घंटाघर आणि चांदनी चौक येथे दुपारी व्यापाऱ्यांची एक श्रद्धांजली सभा होणार आहे. ज्यात शहीदांना श्रद्धांजली देण्यासोबतच पाकिस्तान आणि चीनच्या सामानाचा पुतळाही जाळला जाणार आहे. यासोबतच व्यापारी शहीदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतही करणार असून ही मदत थेट शहीदांच्या परिवारापर्यंत पोहोचवली जाणार आहे.