महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

२२ जुलै : भारतीय ध्वज स्वीकृती दिन - तिरंगा राष्ट्रीय ध्वज

आज २२ जुलै हा राष्ट्रीय ध्वज स्वीकृती दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय ध्वजाबाबत लोकांना जागृत करण्याचा उद्देष्य त्यामागे आहे. जो ध्वज कोट्यवधी भारतीयांचा समावेश असलेल्या संपूर्ण राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. ब्रिटिश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला जे स्वातंत्र्य मिळाले. ज्याद्वारे सर्व भारतीयांना देशाच्या कोणत्याही भागात जाण्याचा प्रत्येक अधिकार आणि संधी प्राप्त झाली. राष्ट्रीय ध्वज दिन साजरा करण्याच्या माध्यमातून, आम्ही राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकृती दिन, आमच्या राष्ट्रीय ध्वजाचे महत्व यांचे पुन्हा स्मरण करत असतो आणि त्याला अत्यंत मनोभावाने सॅल्युट, आदर आणि सन्मान देत असतो त्याचप्रमाणे आमच्या नव्या पिढ्यांपर्यंत भारतीय संस्कृती आणि परंपरांचे नेतृत्व करतो

newsnational flag adoption day
तिरंगा

By

Published : Jul 22, 2020, 12:44 PM IST

Updated : Jul 23, 2020, 6:05 AM IST

मुंबई - भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) २२ जुलै १९४७ला, भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला. २४ मार्चला इंंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. स्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. त्यानंतर घटना समितीने २२ जुलैला या ठरावाला मंंजुरी दिली. तो दिवस भारत ध्वज स्वीकृती दिन म्हणून साजरा केला जातो.

परिचय- जगातील प्रत्येक स्वतंत्र देशाचा त्यांचा स्वतःचा ध्वज आहे. स्वतंत्र देशाचे ते चिन्ह आहे. भारताचा राष्ट्रीय ध्वज हा क्षितिजाला समांतर म्हणजे आडवा तिरंगी ध्वज असून त्यावर गडद केसरी रंग अगदी वर आहे. मध्यभागी पांढरा तर तळाला हिरवा रंग समप्रमाणात आहेत. पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी नेव्ही ब्ल्यू रंगाचे अशोक चक्राचे प्रतिनिधित्व करणारे चक्र आहे. त्याची रचना सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील अशोक स्तंभावरुन घेण्यात आली आहे. हे चक्र त्याच्या राजधानीची रचना भासते. त्या चक्राला २४ आरे आहेत.

ध्वज स्वीकृती दिनः

राष्ट्रीय ध्वज स्वीकृती दिन हा २२ जुलैला साजरा केला जात असून भारतीय ध्वजाबाबत लोकांना जागृत करण्याचा उद्देष्य त्यामागे आहे. जो ध्वज कोट्यवधी भारतीयांचा समावेश असलेल्या संपूर्ण राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. ब्रिटिश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला जे स्वातंत्र्य मिळाले. ज्याद्वारे सर्व भारतीयांना देशाच्या कोणत्याही भागात जाण्याचा प्रत्येक अधिकार आणि संधी प्राप्त झाली. राष्ट्रीय ध्वज दिन साजरा करण्याच्या माध्यमातून, आम्ही राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकृती दिन, आमच्या राष्ट्रीय ध्वजाचे महत्व यांचे पुन्हा स्मरण करत असतो आणि त्याला अत्यंत मनोभावाने सॅल्युट, आदर आणि सन्मान देत असतो त्याचप्रमाणे आमच्या नव्या पिढ्यांपर्यंत भारतीय संस्कृती आणि परंपरांचे नेतृत्व करतो.

राष्ट्रीय ध्वज स्वीकृती दिन का साजरा केला जातो-

२२ जुलै रोजी भारतीय राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार करण्यात आल्याच्या स्मृत्यर्थ हा दिन साजरा केला जातो. देशभक्तीच्या खऱ्या अर्थाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तसेच भारतीय लोक विशेषतः तरूण आणि भावी पिढ्यांमध्ये स्वातंत्र्याचा खरा अर्थ आणि उर्जा निर्माण करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार करण्यात आला. राष्ट्रीय ध्वज स्वीकृती दिन साजरा करण्याचे आणखीही एक महत्व असून त्याद्वारे भारतीय राष्ट्रीय ध्वजाची किमत लोकांना कळावी आणि भारतीय ध्वजाचा इतिहास समजावा, म्हणूनही तो साजरा केला जातो. भारतीय राष्ट्रीय ध्वज हा संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करत असल्याने लोकांनी त्याचा आदर केला पाहिजे.

भारतीय राष्ट्रीय ध्वज स्वीकृती दिनाचा इतिहास-

भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना पिंगाली वेंकय्या यांनी केली असून २२ जुलै १९४७ रोजी प्रथम भारतीय घटक विधानसभेच्या बैठकीत त्यास मान्यता देण्यात आली. म्हणून १९४७ पासून तो २२ जुलै रोजी साजरा केला जात आहे. सध्याच्या स्वरूपातील राष्ट्रीय ध्वज घटक विधानसभेच्या बैठकीत त्याला भारतीय अधिराज्याचा अधिकृत ध्वज म्हणून जाहिर करण्यात आले, तेव्हापासून अधिकृतपणे अस्तित्वात आला.

आमच्या राष्ट्रीय ध्वजात होत गेलेली उत्क्रांती-

पहिला ध्वजः

भारताचा पहिला ध्वज कोलकत्यातील पारसी बेगन चौकात (ग्रीन पार्क) ७ ऑगस्ट, १९०६ रोजी फडकवला गेला, असे सांगितले जाते. त्या ध्वजावर तीन आडव्या रेषा असून त्या लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या होत्या.

भारतीय ध्वज स्वीकृती दिन - 1

दुसरा ध्वजः

यालाच सप्तर्षी ध्वज असे म्हटले जाते. २२ ऑगस्ट, १९०७ रोजी स्टटगार्ट येथील आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसमध्ये तो फडकवण्यात आला.

भारतीय ध्वज स्वीकृती दिन 2

तिसरा ध्वजः

जेव्हा आमच्या राजकीय संघर्षाने निश्चित वळण घेतले तेव्हा १९१७ मध्ये तिसरा ध्वज फडकवला गेला. होमरूल चळवळीच्या दरम्यान डॉ. अनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी तो फडकवला होता. या ध्वजावर पाच लाल आणि चार हिरव्या आडव्या पट्ट्या आळीपाळीने चितारल्या होत्या आणि त्यांच्यावर सप्तर्षीमधील सात तारे चितारले होते. डाव्या कोपऱ्यात सर्वोच्च स्थानी(खांबाचे टोक) युनियन जॅकही होता. एका कोपऱ्यात पांढरी चंद्रकोर आणि ताराही होता.

भारतीय ध्वज स्वीकृती दिन 3

चौथा ध्वजः

श्री पिंगाली वेंकय्या आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्याच्या बेझावाडा(विजयवाडा) या शहरातील रहिवासी होते. यांनी तो ध्वज भारतातील दोन प्रमुख जमाती हिंदू आणि मुस्लीम यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन रंगांचा बनवला होता. गांधींनी भारतातील उर्वरित जातींचे प्रतिनिधित्व दाखवण्यासाठी पांढरी पट्टी त्यात आणखी वाढवण्याचे सुचवले आणि फिरते चक्र हे देशाच्या प्रगतीचे प्रतिक म्हणून दाखवले आहे.

भारतीय ध्वज स्वीकृती दिन4

पाचवा ध्वजः

ध्वजाच्या इतिहासात वर्ष १९३१ हे दूरगामी वर्ष ठरले. आमचा राष्ट्रीय ध्वज म्हणून तिरंगी झेंड्याचा स्वीकार करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सध्याच्या ध्वजाचा पूर्वज असलेला हा ध्वज भगवा, पांढरा आणि हिरव्या रंगातील होता आणि महात्मा गांधी यांनी सांगितलेले चक्र केंद्रस्थानी होते. मात्र, त्यातून काहीही धार्मिक महत्व प्रतित होत नाही आणि हाच अर्थ त्यातून अभिप्रेत आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

भारतीय ध्वज स्वीकृती दिन 5

आताचा ध्वज-

तिरंगाः २२ जुलै,१९४७ रोजी, घटक विधानसभेच्या बैठकीत स्वतंत्र भारतीय राष्ट्रीय ध्वजाला मान्यता देण्यात आली. स्वातंत्र्य मिळाल्यावरही, रंग आणि त्यांचे महत्व तेच राहिले. ध्वजाच्या प्रतिकस्थानी केवळ पूर्वीचे फिरते चक्र जाऊन सम्राट अशोकाचे धर्मचक्र विराजमान झाले. या प्रकारे, काँग्रेस पक्षाचा तिरंगा हा अखेरीस स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वज बनला.

भारतीय ध्वज स्वीकृती दिन 6

पहिला रंगाचा पट्टा-

भगवा देशाची मजबुती आणि धैर्य दर्शवत आहे.

दुसरा रंगाचा पट्टा आणि चक्र

पांढरा रंगाचा पट्टा आणि २४ आरे असलेले धर्मचक्र शांतता आणि सत्य दर्शवते. धर्मचक्र ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकातील मौर्य सम्राट अशोक याच्या सारनाथ सिंह राजधानीत कायद्याचे चक्र म्हणून चितारले होते. प्रगतीत जीवन आहे आणि कुंठित अवस्थेत मृत्यु आहे, हे दर्शवण्याचा या चक्राचा हेतू आहे.

२४ आऱ्या या अर्थ, प्रेम, संयम, मनाची विशालता, विश्वासार्हता, निस्वार्थीपणा, त्याग, सदाचरणी, दया, विनयशीलता, सहानुभूती, नैतिक मूल्ये, ईश्वराची भीती, विश्वास, आशा, अध्यात्मिक, दुसर्याच्या मनातील जाणून घेण्याची कुवत, आकर्षक, न्याय, सत्यतावादी, स्वनियंत्रण, सभ्यता, शांततापूर्ण, चांगुलपणा, धैर्य यांचे प्रतिक मानले जाते.

तिसरा पट्टा-

हिरवा पट्टा हा सुपीकता, विकास आणि जमिनीची शुभलक्षण दर्शवतो.

भारतीय ध्वजाबाबत मनोरंजक माहिती

  • २९ मे, १९५३ रोजी भारतीय ध्वज जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टवर फडकवण्यात आला होता.
  • मॅडम भिकाजी रूस्तम कामा २२ ऑगस्ट, १९०७ रोजी जर्मनीतील स्टटगार्ट येथे परकीय भूमीवर भारतीय ध्वज फडकवणाऱ्या पहिल्या व्यक्ती होत्या.
  • भारतीय राष्ट्रीय ध्वजाने १९८४ मध्ये अंतराळातही प्रवेश केला जेव्हा विंगकमांडर राकेश शर्मा यांनी तो आपल्यासमवेत अंतराळात नेला. राकेश शर्मा यांच्या अंतराळ पोषाखातील एका पदकावर तो चिकटवण्यात आला होता.(पहिले भारतीय अंतराळवीर म्हणून राकेश शर्मा अंतराळात गेले होते).
Last Updated : Jul 23, 2020, 6:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details