नवी दिल्ली - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करतील, असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. आज जम्मू काश्मीर घेतले आहे, उद्या बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीरसुद्धा घेऊ असेही राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदी अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करतील - संजय राऊत - संजय राऊत
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करतील असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
संजय राऊत
आज संसदेत जम्मू काश्मीरच्या संदर्भात लागू असलेल्या ३७० कलमाबाबत महत्वाचा निर्णय झाला. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव गृहमंत्री अमित शाह यांनी मांडला. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, की नरेंद्र मोदी अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करतील.