वॉशिंग्टन - जी-२० शिखर संमेलन जपानमधील ओसाका येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील उपस्थिती लावणार आहेत. शिखर परिषदेसाठी जपानला रवाना होताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी 'मी पुतीन यांच्याशी काय बोलेल हे तुमचे काम नाही', अशा शब्दात त्यांनी पत्रकारांना सुनावले.
जी-20 शिखर संमेलनामध्ये इतर देशांचे प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट होण्याची शक्यता आहे. ट्रम्प आणि पुतीन यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट असणार आहे. या भेटीत युएसचे इराणसोबतचे संबध, सिरीयामधील समस्या, अशा आंतराष्ट्रीय विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.